कोल्हापूर|मोहन कांबळे.
प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका कोल्हापूर संचलित ‘मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर’ (जरगनगर) या शाळेने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इयत्ता चौथी आणि सातवी या दोन्ही परीक्षांमध्ये शाळेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून कोल्हापूरच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला आहे.
वर्षभरात एकही सुट्टी न घेता सकाळी ८ ते सायंकाळी ६ असे सलग १० तास मेहनत घेणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे कष्ट यांमुळेच ही हॅट्रिक शक्य झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी:
* इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती निकाल:
* मृणालिनी सचिन जाधव (२९० गुण) – राज्यात दुसरी
* अर्णव शिवकुमार भोसले (२८८ गुण) – राज्यात चौथा
* आराध्या विकिस पाटील (२८० गुण) – राज्यात ११ वी
* रेवा किरण पाटील (२७४ गुण) – राज्यात १७ वी
* इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती निकाल:
* शिवम बलराम गुरव (९६.६६%) – राज्यात दुसरा
* अथर्व अमर चौगले (९४.६६%) – राज्यात पाचवा
* ओम सचिन कुंभार व शिवबा शशिकांत लांडगे – राज्यात सातवे
* स्वानंदी निशांत पाटील व त्रिशा शशिकांत भोसले – राज्यात आठव्या
* आरव महेश बाणे – राज्यात दहावा
* अपेक्षा खंडेराव लोकरे व विरेंद्र किरण रायकर – राज्यात ११ वे
* स्वराज सागर काशीद, अविनाश जयवंत लोखंडे व वेदांत राजेंद्र काशिद – राज्यात १३ वे
निकालाचा संक्षिप्त तपशील:
इयत्ता ४ थी राज्यात द्वितीय १२ विद्यार्थी व जिल्हा गुणवत्ता ४१ विद्यार्थी
तर इयत्ता ७ वी राज्यात द्वितीय ४ विद्यार्थी तर जिल्हा गुणवत्ता यादीत २० विद्यार्थी .
मार्गदर्शक शिक्षक व प्रेरणास्थान:
या अभूतपूर्व यशामागे इयत्ता ४ थी च्या टीममधील श्री. बी. आर. पिंपळकर, श्री. सुभाष मराठे, श्री. तानाजी दराडे, श्री. संतोष मोरमारे, श्री. नंदकुमार पाटील, सौ. मेघा सावंत, श्री. किरण माळी, सौ. मनिषा रेडेकर, श्रीम. ललिता आढाव आणि इयत्ता ७ वी च्या टीममधील सौ. सुवर्णा सोनाळकर, सौ. सुजाता पोळ, श्री. अजित कानकेकर, सौ. वंदिता महाडिक, कु. प्राजक्ता भंडगे, श्री. पृथ्वीराज आडनाईक या शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले.
तसेच प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी मा. सौ. जयश्री जाधव, शैक्षणिक पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब कांबळे, श्री. विजय माळी, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री. संजय शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे, उपमुख्याध्यापक शिवाजी पाटील, पर्यवेक्षिका श्रीम. विमल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवता आले.
गुणवंत विद्यार्थी, समर्पित शिक्षक आणि पाठिंबा देणाऱ्या पालकांचे संपूर्ण कोल्हापूर शहरातून कौतुक होत आहे.