Thursday, September 17, 2026
HomeCrimeआर. के. नगर, मोरेवाडी परिसरात करवीर पोलिसांची हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांसह कॉलेज विद्यार्थ्यांवर...

आर. के. नगर, मोरेवाडी परिसरात करवीर पोलिसांची हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांसह कॉलेज विद्यार्थ्यांवर कारवाई; ४० जणांकडून ३० हजारांचा दंड

आर. के. नगर, मोरेवाडी परिसरात करवीर पोलिसांची अचानक नाकाबंदी

कोल्हापूर : आर. के. नगर आणि मोरेवाडी परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुण व कॉलेज विद्यार्थ्यांवर करवीर पोलिसांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) अचानक नाकाबंदी करून कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

आर. के. नगर व मोरेवाडी परिसरात काही दुचाकीस्वारांकडून विनापरवाना वाहन चालविणे, वाहनांना नंबर प्लेट नसणे तसेच दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांनी अचानक नाकाबंदीचे आयोजन केले.

नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी संशयास्पद तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांची तपासणी केली. यामध्ये विनापरवाना वाहन चालविणे, विना नंबर प्लेट वाहन चालविणे आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे परिसरातील दुचाकीस्वारांमध्ये काही काळ खळबळ उडाली.

ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक टिपूगडे, पोलीस शिपाई क्र. २४५० मुंडे तसेच होमगार्ड क्र. ४९० नलवडे, ९८२ सूर्यवंशी, ५६१ कोरोसी, ११२१ बेरकल, १७३१ पाटील आणि १३३७ चाबूक यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, शहरालगतच्या परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात अशा प्रकारची तपासणी आणि कारवाई पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. विशेषतः अल्पवयीन अथवा परवाना नसलेल्या व्यक्तींनी वाहन चालवू नये, तसेच दुचाकीवर तिघांनी प्रवास करून स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular