Tuesday, September 22, 2026
HomeCrimeकागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघासाठी ९१ कोटींचा निधी मंजूर, रस्ते व ‘ब’ वर्ग...

कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघासाठी ९१ कोटींचा निधी मंजूर, रस्ते व ‘ब’ वर्ग तीर्थस्थळांच्या विकासासाठी निधी

कागल, दि. २२ : कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसह ‘ब’ वर्ग तीर्थस्थळांच्या विकासासाठी तब्बल ९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे योगदान लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये नानीबाई चिखली-निपाणी, सुळकुड-कोगनोळी, बोरवडे, व्हनाळी-साके, उंदरवाडी, मेतके-हमीदवाडा, कौलगे, जख्खेवाडी आणि उत्तूर-होन्याळी या रस्त्यांचा समावेश आहे.

मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पातून विविध रस्त्यांसाठी ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येवती पाटी-बाचणी-साके-सावर्डे बुद्रुक-चौंडाळ, बिद्री-वाळवे-बाचणी-व्हनाळी-शेंडूर-वंदूर-करनूर, हसूर बुद्रुक-बोळावी-ठाणेवाडी-अवचितवाडी-चिमगाव-मुरगूड, लिंगनूर-सेनापती कापशी-तमनाकवाडा-माद्याळ-बहिरेवाडी-वडरगे-गडहिंग्लज यासह अन्य रस्त्यांच्या कामांचा यात समावेश आहे.

‘ब’ वर्ग तीर्थस्थळांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मेतके येथील श्री बाळूमामा-सत्यव्वा देवी मंदिर मूळक्षेत्रासाठी २ कोटी, यमगे येथील श्री अंबाबाई मंदिरासाठी २ कोटी १ लाख, भडगाव येथील श्री हनुमान मंदिरासाठी २ कोटी १० लाख, कसबा सांगाव येथील हजरत लाडले मशाकात दर्ग्यासाठी २ कोटी १ लाख, पिराचीवाडी येथील श्री गहिनीनाथ देवालयासाठी ७५ लाख आणि सिद्धनेर्ली येथील श्री सिद्धेश्वर देवालयासाठी १ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘ब’ वर्ग तीर्थस्थळांच्या यादीत गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे येथील श्री केदारलिंग मंदिर, करंबळी येथील श्री नारायण मंदिर आणि शिप्पूर येथील श्री रामलिंग मंदिर यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

या निधीतून मतदारसंघातील रस्ते तसेच धार्मिक व तीर्थस्थळांच्या पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून, संबंधित कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular