Monday, September 28, 2026
HomeCrimeबकरी चोरी करणाऱ्या दोघांना पन्हाळा पोलिसांकडून अटक; १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल...

बकरी चोरी करणाऱ्या दोघांना पन्हाळा पोलिसांकडून अटक; १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

पन्हाळा प्रतिनिधी, शहानवाज मुजावर:

पन्हाळा तालुक्यातील सुर्वेवाडी डोंगर माळ परिसरात बकरे चोरी करणाऱ्या दोन संशयितांना पन्हाळा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन च्या सुमारास सुर्वेवाडी डोंगर माळ परिसरात फिर्यादी आपल्या शेळ्या व बकरे चरण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने फिर्यादीची नजर चुकवून त्यांच्या ताब्यातील एक बकरा मोटारसायकलवर बसवून चोरी करून नेला. याप्रकरणी पन्हाळा पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर रमजान महमद गडकरी (वय २८) व रोहित राजेंद्र कार्वेकर (वय ३२), दोघे रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, यांना दि. २७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपींनी बकरे चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली सुमारे ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल तसेच चोरी बकरे (पालवे) कापून कमाविलेली ३५,०००/- रू रक्कम असा एकूण १,०५,०००/-रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.आहे
ही कारवाई कोल्हापूर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक निगाप्पा चौकडे व समीर मुल्ला मारूती नाईक स .फौ समीर मुल्ला, तौसिफ मुल्ला,दिगंबर चिले, अरूण पाटील, प्रकाश पाटील ,रविंद्र कांबळे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली या पथका चे कौतुक होत आहे तसेच पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular