Monday, October 5, 2026
HomePoliticalशिक्षणाची साथ, सामाजिक बांधिलकीची जपणूक; आमदार कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

शिक्षणाची साथ, सामाजिक बांधिलकीची जपणूक; आमदार कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

पन्हाळा प्रतिनिधी, शहानवाज मुजावर:
पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पोवार (तोरसे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी तसेच सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास नगरसेविका प्रगती गवंडी, संध्या पवार, दिपाली काशीद, प्रियांका गवळी, रशिदा मुजावर, शबाना मुल्ला, इंद्रायणी आडनाईक, नगरसेवक सखाराम काशीद, लक्ष्मण कांबळे, रामानंद गोसावी, शहाबाज मुजावर तसेच ज्येष्ठ नागरिक संभाजी गायकवाड, संतोष उर्फ बाळू काशीद उपस्थित होते.
शिक्षक सरदार गायकवाड यांनी स्वागत केले, तर आशिष उदाळे यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक रविंद्र तोरसे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पोवार यांनी मनोगत व्यक्त करताना, ज्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून सेवा बजावली, त्याच शाळेत नगराध्यक्षा म्हणून उपस्थित राहता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच कुमार व कन्या शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कुमार शाळेच्या मुख्याध्यापिका रचना चिले यांनी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पोवार यांचा विशेष सत्कार केला. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री देशमाने यांनी दोन्ही शाळांच्या वतीने आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे नियोजन अमितराज पोवार व धनंजय बच्चे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular