कोल्हापूर : गोकुळ अध्यक्ष निवडी वरुन राजकीय घडामोडीना वेग आला आहे. कोणत्या ही परिस्थितीत काँग्रेसचा अध्यक्ष होउ नये यासाठी महायुतीत नेतृत्वाने मोठा डाव आखला आहे.गोव्यात झालेल्या या नेत्यांच्या बैठकीत मोठी व्युहरचना आखली जात आहे.उद्याच्या अध्यक्ष निवडीवेळी सर्व १२ सदस्य गैरहजर राहून कोरम अभावी सभा तहकूब करण्याचे ठरले तर नवीन चार स्विक्रुत सदस्य नियुक्त करून सदस्य संख्या वाढवून गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा डाव आखला असल्याचे समजते तर येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाचे बैठकीत या चार स्विक्रुत सदस्य नियुक्तीस मंजुरी घेण्याचे ठरले.कोणत्याही परिस्थितीत गोकुळ काँग्रेसच्या म्हणजे आ.बंटी पाटील यांच्या ताब्यात दयायचा नाही असे ठरले. त्यामुळे उद्याची अध्यक्ष निवड बारगाळणार असून दिपावलीच्या नंतर ही निवड प्रक्रिया होणार आहे.गोकुळ अध्यक्ष निवडी वरून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा राजकीय धुरळा उडणार आहे.