बालिंगे (मोहन कांबळे):
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) राज्य शासनाकडून पाच शासन नियुक्त संचालक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक सभासद व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या कुटिल कारस्थानाचा व अध्यादेशाचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा (ता. करवीर) येथील बस स्टॉपजवळ अमर उर्फ अमृत पांडुरंग पाटील (शिंगणापूरकर) यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.
आमदार सतेज (बंटी) पाटील गटाचे १३ संचालक निवडून आले असताना, लोकशाहीच्या मार्गाने जनतेने दिलेला कौल डावलून हुकूमशाही पद्धतीने शासन नियुक्त संचालक लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलकांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अध्यादेशाची प्रत व प्रतिकात्मक पुतळा दहन करून शासनाचा तीव्र निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना अमर पाटील यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्र शासनाने गोकुळवर शासन नियुक्त संचालक लादून कोल्हापूरचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. सतेज पाटील यांनी सामान्य दूध उत्पादकांना दिलेला न्याय अबाधित ठेवण्यासाठी हा लढा सुरुच राहील. येत्या ९ तारखेला भव्य मोर्चा काढण्यात येईल, तसेच अन्यायाविरुद्ध कोल्हापूरची ही धगधगती लढाई कायम राहील.”
या निषेध आंदोलनात लोकशाही व सनदशीर मार्गाने आपला विरोध दर्शवून शासनाने काढलेला हा अध्यादेश तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संजय पाटील वाखरेकर पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील नागदेवाडीकर शरद निगडे यांची निषेधार्थ जोशपुर्ण भाषणे झाली . यावेळी वाकरे ,दोनवडे, बालिंगे, नागदेवाडी, शिंगणापूर येथील कार्यकर्ते हजर होते. त्यापैकी अनिल पवार, महेश पाटील चेअरमन, यशवंत बॅंक,राजेंद्र चौगुले, अजय भवड ,शरद निगडे ,शिवाजी ढेरे, बाळू दिवसे माजी सरपंच नागदेवाडी, विजय पोवार, उत्तम निगडे ,सर्जेराव पोवार, भीमराव कांबळे ,उत्तम मस्कर, अशोक चव्हाण ,महेश यशवंत पाटील, धनंजय ढेंगे, पिंटू ढेंगे, विकास जांभळे, राजाराम कदम, सुहास साळुंखे ,नाना चौगुले इत्यादी असंख्य कार्यकर्ते हजर होते. लोकशाही च्या सनदशीर मार्गाने आजचे आंदोलन पार पडले.
आंदोलनादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने करवीर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.