Sunday, November 8, 2026
HomePoliticalगोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात संघर्ष मोर्चा !

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात संघर्ष मोर्चा !

कोल्हापूर : गोकुळ दूध संघात शासननियुक्त ४ संचालकांची नियुक्ती केल्याने त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालीली राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आज सोमवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात राज्यभरातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी ।छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला सुरुवात होईल. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. तेथे मान्यवरांच्या भाषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चाला जास्तीत जास्त दुध उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर मंडप..

सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके बसत असल्याने त्यापासून सरंक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर मंडप उभारण्यात आला आहे. रविवारी मंडप उभारण्याचे काम सुरु होते. या मोर्चाच्या नियोजनासाठी समविचारी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रविवारी नियोजनात व्यस्त होते. विशेष म्हणजे मोर्चेकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीने मंडप, कार्पेट, टाकून बसण्याची केलेली व्यवस्था तसेच पाण्याची सोय केली आहे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने आयोजन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular