Thursday, November 12, 2026
HomeCrimeपाचगावात तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जण ताब्यात! ...

पाचगावात तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जण ताब्यात! सहा दुचाकी, १३ मोबाईलसह ३ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पाचगाव :करवीर तालुक्यातील शांतीनगर, गाडगीळ कॉलनी, पाचगाव येथे सुरू असलेल्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळताना १३ जण आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोटारसायकली, १३ मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८६ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जागामालकासह १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना शांतीनगर, गाडगीळ कॉलनी येथील प्रदीप भगवान गाडगीळ यांच्या मालकीच्या फ्लॅटमधील पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकासह ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी १३ जण तीन पानी पत्त्यांच्या जुगारावर पैसे लावून खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सहा मोटारसायकली, १३ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ३,८६,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत सागर निवृत्ती हवालदार, रविंद्र प्रसाद भोसले, ईश्वर सुदाम कांबळे, प्रमोद पिराजी इंगवले, विशाल आकाराम पोवार, प्रदीप भगवान गाडगीळ, उत्तम दिनकर हवालदार, शिवाजी आनंदा हवालदार, नितीन शिवाजी पाटील, दत्तात्रय पिराजी इंगवले, प्रतीक प्रकाश गुरव, अनिल दादू ईराचे आणि विशाल दत्तात्रय खेतल यांचा समावेश आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सचिन देसाई, रणजित पाटील, प्रदीप यादव, सुशील सावंत, आत्माराम शिंदे, सोमराज पाटील, प्रविण बोरचाटे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, अनिल बरगे, रिफीक मुल्ला आणि राजकुमार पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

अवैध धंद्यांविरोधात करवीर पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, अशा धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular