Friday, April 3, 2026
HomeSocialअमन फाउंडेशनतर्फे “ऑल अबाउट ऑटिझम” कार्यशाळेचे आयोजन

अमन फाउंडेशनतर्फे “ऑल अबाउट ऑटिझम” कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर : २ एप्रिल हा दिवस जागतिक स्वमग्नता (ऑटिझम) जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अमन फाउंडेशन, कोल्हापूरतर्फे समाजात ऑटिझमबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच अनुषंगाने अमन फाउंडेशन व सायबर कॉलेज, कोल्हापूरच्या समाजकार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल २०२६ रोजी “ऑल अबाउट ऑटिझम” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सायबर कॉलेज येथे पार पडणार आहे.

या कार्यशाळेत हैदराबाद येथील नाओमी सेंटरचे तज्ज्ञ डॉ. इव्हीव्ही राजसेखर मार्गदर्शन करणार आहेत. प्रात्यक्षिके आणि रोल प्लेच्या माध्यमातून विषयाची सविस्तर मांडणी करण्यात येणार आहे.

कार्यशाळेत ऑटिझम म्हणजे काय, त्याचे लवकर निदान कसे करता येईल, शिक्षण व उपचारांची दिशा, तसेच स्वमग्न मुलांचे भविष्य यासंबंधी पालक, शिक्षक व वैद्यकीय व्यावसायिकांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाणार आहे.

ही कार्यशाळा पालक, हेल्थकेअर वर्कर्स, शिक्षक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रवेश मर्यादित असून नोंदणी शुल्क २०० रुपये ठेवण्यात आले आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमन फाउंडेशनच्या संस्थापिका दीपा शिपुरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७०२०० ५६२२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular