कळे : येथील निलेश रंगराव लायकर यांच्या जनावरांच्या गोठ्याचे वादळी वारा आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले. तळेवाडी (ता. पन्हाळा) येथे त्यांच्या शेतीत गोठा बांधलेला आहे.
दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे गोठ्यावरील सिमेंटचे पत्रे उडून गेली, तर भिंतीचाही काही भाग कोसळला. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
सुदैवाने या घटनेत जनावरांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोठ्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विभागाकडून पंचनामा करून मदत देण्याची मागणी होत आहे.