कोल्हापूर/मोहन कांबळे.:
आज शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी चमकलेल्या जरग विद्यामंदिरच्या चिमुकल्यांच्या पाठीवर प्रशासनाकडून शाबासकीची थाप पडली.
नुकत्याच जाहीर झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ” *The school of scholars* ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या *_जरगनगर पॅटर्नची_* जादू कायम राहिली . *शाळेचे तब्बल 15 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व 42 विद्यार्थी जिल्हा यादीत चमकले .अशा एकूण 57 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले .*
आज कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय श्री किरणकुमार धनवाडेसो तसेच प्रशासन अधिकारी सौ. जयश्री जाधवसो यांच्या शुभहस्ते राज्य व जिल्हा गुणवंत यादीतील विद्यार्थी तसेच वर्षभर एकही सुट्टी न घेता मार्गदर्शन केलेल्या सर्व मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना उपायुक्त किरणकुमार धनवाडे म्हणाले, “शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे”.तर प्रशासनाधिकारी सौ . जयश्री जाधव यांनी शाळेतील, शिक्षक मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांनी महापालिकेच्या शाळेला जी उंची प्राप्त करून दिली आहे त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले .विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले .
याप्रसंगी शिष्यवृत्ती वर्गाला वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता मार्गदर्शन करणाऱ्या सौ .वर्षा पाटील सौ .सुजाता दाभोळकर , सौ .ज्योती उबाळे ,श्री. दिग्विजय नाईक,सौ. पल्लवी देसाई,श्री. सुरेश आप्पा केरुरे ,श्री.सहदेव कांबळे,सौ सुवर्णा पाटील या मार्गदर्शकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच प्रशासन अधिकारी सौ जयश्री जाधव मॅडम यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या .
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी श्री रसूल पाटील,शैक्षणिक पर्यवेक्षक श्री बाळासाहेब कांबळे,श्री विजय माळी, शिष्यवृत्ती विभागप्रमुख श्री.संजय शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीता ठोंबरे, उपमुख्याध्यापक श्री शिवाजी पाटील, सर्व शिक्षक ,सेवक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुवर्णा सोनाळकर यांनी केले .आभार श्री .शिवाजी पाटील सर यांनी मांडले .