बालिंगा/ प्रतिनिधी: बालिंगा, ता. करवीर येथील श्री कात्यायनी सहकारी दुध उत्पादक संस्था यांचे चेअरमनपदी श्री विश्वनाथ गुंडा माळी व व्हाईस चेअरमन पदी श्री मोहन दिनकर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते चेअरमन,व्हाईस चेअरमन श्रीमती अनिता जत्राटे व विश्वनाथ माळी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची निवड करण्यात आली.
या वेळी केरबा जांभळे, अनिल जांभळे, शशिकांत खांडेकर, शशिकांत चौगले, माजी सरपंच नंदकुमार जांभळे, विजय जत्राटे,शंकर काटे, सरदार जांभळे, डॉ.उत्तम पाटील, तसेच जेष्ठ सभासद श्रीकांत भवड, शाहु विकास संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन जांभळे, बालिंगा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल पोवार,
संस्थेचे सचिव संजय वागवेकर,कृष्णात पाटील, भिकाजी जत्राटे उपस्थित होते.