Sunday, May 17, 2026
HomeAgricultureशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची महायुती सरकारची घोषणाच सत्तेवर आल्यानंतर घुमजाव; शेतकऱ्यांच्या...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची महायुती सरकारची घोषणाच सत्तेवर आल्यानंतर घुमजाव; शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

कोल्हापूर / दोनवडे (श्रीकांत पाटील) :
महायुती सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सत्तेवर नसताना सातबारा कोरा करु आणि सत्तेवर आल्यानंतर घुमजाव केले आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. आता दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार अशी घोषणा केली आहे. पण याआधी काँग्रेस सरकारने कर्जमाफी केली त्या सरकारने कर्जमाफीसाठी कोणतेही निकष ठेवले नव्हते. महायुती सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः गंडवले आहे.
महापूर, कोरोना आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी पिचला गेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे आकडे वाढतच चालले आहेत. सरकारने आमचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. आता फक्त दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जात आहे. मग आमचा सातबारा कोरा नेमका कधी होणार?” असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

रत्नापूर येथील शेतकरी अंगत टेकाळे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “उद्योजकांची मोठमोठी कर्जे माफ केली जातात; मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरकार हात आखडता घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.”

याशिवाय काही शेतकऱ्यांनी सरकारच्या इतर योजनांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. “लाडक्या बहिणी योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यासाठी सरकारकडे निधी आहे; मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना मात्र टाळाटाळ होत आहे का?” असा सवालही काही शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सरकारकडून जाहीर झालेल्या दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या योजनेचे नेमके निकष, पात्रता आणि अंमलबजावणीची प्रक्रिया स्पष्ट झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र गावखेड्यांतील चावड्या, पार आणि बाजारपेठांमध्ये कर्जमाफीवरून चर्चा सुरूच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular