Sunday, June 21, 2026
HomeHealth & Fitnessपन्हाळा नगरपरिषद आणि पन्हाळा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक योग दिन' उत्साहात

पन्हाळा नगरपरिषद आणि पन्हाळा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक योग दिन’ उत्साहात

पन्हाळा प्रतिनिधी, शहानवाज मुजावर:
येथील पन्हाळा नगरपरिषद आणि पन्हाळा विद्यामंदिर, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ​या दिमाखदार सोहळ्यासाठी पन्हाळा नगरीच्या नगराध्यक्षा जयश्री पवार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पन्हाळा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. एस. एच. कवठेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पन्हाळा नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, विद्यामंदिरमधील शिक्षक, स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​या योग दिनानिमित्त प्रमुख योग प्रशिक्षक म्हणून गीता परिवार, जयसिंगपूरचे ख्यातनाम योग शिक्षक श्री. श्रीधर बनसोडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत, “योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती मन आणि शरीर जोडणारी एक सुंदर साधना आहे,” असे प्रतिपादन केले. ​कार्यक्रम दरम्यान श्रीधर बनसोडे यांनी विद्यार्थ्यांकडून आणि उपस्थितांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली.
यामध्ये खालील घटकांवर विशेष भर देण्यात आला:
​प्राणायम आणि ध्यान: मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी प्राणायामाचे विविध प्रकार शिकवण्यात आले.

​सूर्यनमस्कार: शरीरातील ऊर्जा आणि लवचिकता वाढवण्यासाठी सूर्यनमस्कारांची अचूक प्रात्यक्षिके घेण्यात आली.

​आसनांची माहिती: दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध आसनांची माहिती देऊन ती कशी करावीत आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

​ नगराध्यक्षा जयश्री पोवार मॅडम, मुख्याध्यापक कवठेकर सर, सर्व शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी यावेळी सामूहिक योग साधना केली. संपूर्ण परिसर या निमित्ताने योगमय वातावरणाने प्रफुल्लीत झाला होता. सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular