Sunday, July 19, 2026
HomeSocial'हिल रायडर्स' संस्थेच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड अमृत महोत्सवी मोहिम

‘हिल रायडर्स’ संस्थेच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड अमृत महोत्सवी मोहिम

पन्हाळा प्रतिनिधी (शहाबाज मुजावर):

पन्हाळा ते पावनखिंड या ७५ व्या अमृत महोत्सवी मोहिमेचा थाटात शुभारंभ झाला. कोल्हापूरच्या प्रसिद्ध ‘हिल रायडर्स’ संस्थेच्या वतीने या अत्यंत खडतर आणि ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संस्थेचे हे सातत्यपूर्ण ४१ वे वर्ष असून या अंतर्गत ७५ व्या मोहिमेचा दिमाखदार सोहळा पार पडत आहे. या मोहिमेत राज्यभरातून तब्बल ७५० शिवप्रेमी युवक-युवती मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
मोहिमेची सुरुवात पन्हाळगड येथील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करून झाली.’जय भवानी, जय शिवाजी’, विर शिवा काशिद नरविर’बाजीप्रभू देशपांडे यांचा विजय असो’ अशा अशा घोषणांनी परिसर दमदुमून गेला होता.शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या जयघोषात आणि संपूर्ण शिवमय वातावरणात ऐतिहासिक उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विधीवत पूजन करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गडप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा हिल रायडर्स संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
ध्येयमंत्र आणि मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके
कार्यक्रमाची सुरुवात झाली.

गारद श्रीगोंदा येथून आलेल्या तरुण शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक ललकारी म्हणजेच ‘राजांची गारद’ देऊन अवघा परिसर शिवकालीन वातावरणात न्हाऊन निधाला
शौर्य प्रात्यक्षिके ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या धारकऱ्यांनी सादर केलेली लाठी-काठी, तलवारबाजी आणि दांडपट्ट्याची थरारक प्रात्यक्षिके उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
“हा केवळ ट्रेक नाही, तर पूर्वजांच्या रक्ताने पावन झालेल्या मातीची कृतज्ञता आहे!”
इतिहास अभ्यासक व लेखक श्री. राहुल नलवडे (रायबा) यांनी आपल्या अमोघ वाणीतून पन्हाळगड ते पावनखिंड या रणसंग्रामाचा संपूर्ण शौर्यशाली इतिहास जिवंत केला. त्यांच्या व्याख्यानाने मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक शिलेदाराच्या अंगात एक नवी ऊर्जा आणि वीरश्री संचारली.
हिल रायडर्सच्या शिलेदारांनी संस्थापक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वा खाली हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. त्यांच्या या अथांग परिश्रमांचे आणि ७५ व्या अमृत महोत्सवी मोहिमेच्या भव्य नियोजनाचे सर्वच स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, नगराध्यक्षा पवार, उपनगराध्यक्ष सतिश भोसले, क्रिडा सभापती विजय खाडे, सन्मती मिरजे, जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस इ, उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular