कोल्हापूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना भोजन वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे अंधशाळेतील विद्यार्थ्यांना प्रेमाने भोजन देत समाजाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष आदिल फरास, नगरसेवक गवंडी, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील, करवीर तालुका अध्यक्ष शिवाजी देसाई, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, संदीप कांबळे (संजय गांधी सदस्य, करवीर), उपाध्यक्ष दिलीप सावंत, अण्णाप्पा खमले हट्टी, दादासाहेब चोपडे, राजू बामणेकर, प्रशांत बुचडे, प्रकाश जगताप तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.