Monday, August 3, 2026
HomeAdministrationभोगावती पूल वाहतुकीसाठी बंद; दुचाकींना प्रवेश

भोगावती पूल वाहतुकीसाठी बंद; दुचाकींना प्रवेश

बालिंगा | मोहन कांबळे

बालिंगा येथील भोगावती नदीवर नवीन पुलाचे प्रमुख बांधकाम अंतिम टप्प्यात सुरु आहे. या पुलावरील स्पॅन PI-P2 च्या स्लॅब काँक्रीटीकरणाचे काम उद्या दि.४/८/२०२६ रोजी करण्यात येणार असल्याने जुन्या पुलावरून वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
या जुन्या पुलावरून फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश असेल त्यामुळे सदर वहातुक गगनबावडाकडुन येणारी वाहतुक सांगरुळ फाटा – कुडित्रे – कोगे- पाडळी खुर्द – बालिंगा मार्गे कोल्हापूरकडे वळविण्यात येईल
कोल्हापूर कडुन येणारी वाहतुक बालिंगा – पाडळी खुर्द – कोगे – कुडीत्रे सांगरुळ फाटा मार्गे गगनबावडा कडे वळविण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular