Sunday, August 23, 2026
HomeCrimeआजाराला कंटाळून बहिरेश्वर येथे ७५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

आजाराला कंटाळून बहिरेश्वर येथे ७५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

बहिरेश्वर प्रतिनिधी : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील प्रतिष्ठित नागरिक ह.भ.प. बाजीराव अर्जुना दिंडे (वय ७५) यांनी प्रदीर्घ आजाराला कंटाळून विषारी तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी दिंडे यांनी आपल्या राहत्या घरी विषारी तणनाशक प्राशन केले. ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळी ११ वाजता त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular