बालिंगा/प्रतिनिधी:
बालिंगा तालुका करवीर येथे परप्रांतीय गवंडी कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. शनिवारी हा खून झाल्याचा संशय व्यक्त होत असून आज गल्लीमध्ये दुर्गंधी पसरल्यानंतर हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महादेव रामू गवसेकर वय ६५ रा. खानापूर जिल्हा बेळगाव असे खून झालेल्या गवंडी मजुराचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक शंकर कळकुटे, महिला पोलीस नाईक परवीन मुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालिंगा तालुका करवीर येथे घरमालक वसंत कृष्णा ढेंगे यांचे ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस हनुमान गल्लीमध्ये घर आहे. या घरात खानापूरहून येथे राहण्यासाठी आलेले मुकादम कल्लाप्पा मळवकर रा. मोदेकोप तालुका खानापूर जिल्हा बेळगाव यांच्या समवेत मजदूर महादेव रामू गवसेकर, व सुरेश ( आडनाव समजू शकले नाही ) यांच्यासह
अन्य दोघेजण राहत होते. या परिसरात बालिंगा नागदेवाडी या ठिकाणी हे फरशी काम फरशी फिटिंग व घराची बांधकाम करण्याचे गवंडी काम करत होते.
गणपती उत्सवापूर्वी परिसरात काम आटोपून गणपती उत्सवाला हे गावी गेले होते. सुट्टीवरून आल्यानंतर नागदेववाडी येथील उत्तम निगडे यांच्या घरी फरशी फिटिंग चे अपुरे राहिलेले काम यांनी पूर्ण केले आहे.
यानंतर उत्तम निगडे यांच्याकडून मुकादम कल्लाप्पा मळवकर यांनी २८ रोजी या कामाचे मजुरी पैसे घेतले होते.
यानंतर उत्तम निगडे यांनी मुकादम कल्लाप्पा मळवकर यांना संपर्क केला होता. यानंतर कल्लाप्पा यांचा फोन नॉटरीचेबल लागत होता. यानंतर खून झालेले महादेव रामू गवसेकर हे कोठेही दिसून आले नाही.
यानंतर गल्ली पूर्व पश्चिम असल्यामुळे ज्या घरामध्ये हे गवंडी मजूर राहत होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उग्र दुर्गंधी पसरलेली नागरिकांच्या लक्षात आली. दुर्गंधी पसरलेली माहिती पोलीस पाटील अर्चना पाटील यांना देण्यात आली. यावेळी करवीर पोलिसांची संपर्क साधून पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी पाहणी केली असता खून झालेल्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. खून झाल्यानंतर या व्यक्तीची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. यामुळे हा खून शनिवारी झाला असेल अशी शंका व्यक्त होत होती. दुपारी तीनच्या आसपास पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, यावेळी दुर्गंधी येणाऱ्या घरामध्ये पाहणी केली असता सडलेल्या अवस्थेत महादेव गवसेकर यांचा मृतदेह आढळून आला. यामध्ये मृतदेह अंथरुणात होता , मृतदेहावर उजव्या हाताच्या मनगटावर छातीवर गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले आहे. गेली कित्येक दिवस रक्ताच्या थारोळ्यात हा सडलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. अंथरुणात असल्यामुळे झोपेतच त्याच्यावर हल्ला केला असेल असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत होता. यावेळी
पंचनामा केला यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्रीतम केसरकर रविराज बलुगडे यांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पुढे पाठविण्यास मदत केली. तसेच
पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ञ यांना पाचारण करून ठसे घेतले आहेत.