Wednesday, November 4, 2026
HomePoliticalअयोध्या फाउंडेशनने २० वर्ष जोपासला सैनिक दिवाळीचा अतूट स्नेहबंध..! घरच्या चवीचा फराळ...

अयोध्या फाउंडेशनने २० वर्ष जोपासला सैनिक दिवाळीचा अतूट स्नेहबंध..! घरच्या चवीचा फराळ अन् मिठाई पाठवून केली सैनिकांची दिवाळी गोड : डॉ.मंजुश्री पवार यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

👇

——-

कोल्हापूर : देशाच्या सीमेवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र पहारा देत देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांनाही घरच्या सणाचा आनंद अनुभवता यावा,या उदात्त हेतूने अयोध्या फाउंडेशन, शिंगणापूर तर्फे गेल्या २० वर्षांपासून सातत्याने दिवाळी फराळ व मिठाई पाठविण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून,ती सामाजिक बांधिलकी व भारतीय सैनिकांप्रती असलेली कृतज्ञता यांचा सुंदर संगम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधिका डॉ.मंजुश्री पवार यांनी केले.
नुकत्याच अयोध्या फाउंडेशन आयोजित ‘सैनिक दिवाळी फराळ’ उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. गेल्या दोन दशकांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमातून अयोध्या परिवाराने भारतीय जवानांशी एक भावनिक नाते निर्माण केले असून,सीमेवर कर्तव्य बजावताना सण-उत्सवापासून दूर असलेल्या जवानांपर्यंत घरच्या चवीचा फराळ आणि मिठाई पोहोचवून, पाटील परिवाराने सैनिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम केले आहे. आपल्या या सामाजिक उपक्रमातून त्यांनी सैनिकांप्रती संवेदनशीलता व आपल्यापुढे राष्ट्रप्रेमाचा खरा आदर्श घालून दिले असल्याचे डॉ.पवार यांनी नमूद केले.
यावेळी भारतीय सैन्य दलातील *१४ राष्ट्रीय रायफल्स, १४ आसाम रायफल्स, ७ वी बटालियन गढवाल रायफल्स तसेच गढवाल स्काउट्स* या तुकडीतील जवानांना दिवाळी फराळ व मिठाईचे गिफ्ट बॉक्स पाठविण्यात आले तसेच अवनी, हेल्पर ऑफ हॅंडीकॅप आणि हिरवाई सातारा यांसारख्या सामाजिक संस्थांना ही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अयोध्या फाउंडेशन परिवाराचे कॅप्टन उत्तम पाटील, वृषाली पाटील, प्रा. अरुण मराठे, किरणकुमार साळुंखे, मोहन लोहार, शिवलोचन कारंडे, डॉ. इंद्रनील मोहिते, नारायण चौगुले, कृष्णात वरुटे, संजय देसाई यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, युनिव्हर्सल परिवाराचे सदस्य, मित्रमंडळी व सहकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular