Wednesday, November 4, 2026
HomePoliticalगोकुळचा अध्यक्ष आज मुंबईत ठरणार...

गोकुळचा अध्यक्ष आज मुंबईत ठरणार…

कोल्हापूर: कोल्हापूरच्या गोकुळच्या राजकारणाला मोठी उकळी फुटलीय असे स्पष्ट दिसते. काही दिवसांपूर्वी गोकुळची निवडणूक झाली. या निवडणुकीत आ. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला १३ तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. या निवडणुकीत गोकुळचे अध्यक्षपद निश्चित मानले गेलेल्या शौमिका महाडिक, नाविद मुश्रीफ, विश्वास पाटील,अरूण डोंगळे यांच्यासह अनेक बलाढ्य संचालकांना मतदारानी नाकारलं आ. सतेज पाटील यांनी मात्र समांतर सभा घेउन गोकुळचे संस्थापक कै.आनंदराव पाटील यांचे चिरंजीव शशिकांत यांची बहूमताच्या जोरावर अध्यक्ष केले. पण हे सत्तेचे स्वप्न पहाणाऱ्या महायुती नेत्यांच्या पचनी पडले नाही.आता त्यांनी शासन नियुक्त चार सदस्य घेउन आपला अध्यक्ष करण्याचा डाव आखला आहे.आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.त्यास मंजुरीही मिळेल अशी ताकदच काय व्युहरचना केली आहे.त्यामुळे आजचं कोल्हापूरच्या या गोकुळ दुध संघाच्या अध्यक्षांची निवड मुंबईतून होणार आहे. महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाचा अध्यक्ष होईल. काँग्रेस नेते आ. सतेज पाटील यांच्या नाकावर टिच्चून म्हणजेच त्यांना शह देण्यासाठी माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करण्यात येणार असल्याचे समजते. अध्यक्ष निवडी बाबत कोल्हापूरच काय महाराष्ट्राचे लक्ष आज मुंबईकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular