Saturday, April 18, 2026
HomeSocialआदमापूर यात्रेवर १८३ तिसऱ्या डोळ्याची नजर

आदमापूर यात्रेवर १८३ तिसऱ्या डोळ्याची नजर

मुदाळतिट्टा/प्रतिनिधी:

     महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र,गोवा, राजस्थान,कोकण व अन्य राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या पाच दिवस चालणाऱ्या भंडारा यात्रेवर १८३ सीसीटीव्ही वॉच ठेवणार आहेत. भाविकांची मोठी गर्दी या यात्रेला होणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे यावर्षी एवढ्या मोठ्या संख्येने सीसीटीव्ही जोडून संपूर्ण यात्रा निगराणीखाली आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे.

       रविवार दिनांक २५ रोजी जागर यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी निढोरी ते आदमापूर अशा मार्गावर बाळूमामाच्या रथाची मिरवणूक होणार आहे. या रथामध्ये बाळुमामाची 138 किलो वजनाची चांदीची मूर्ती तसेच बाळूमामाच्या मेंढी माऊलींच्या दूधाचे कलश मंदिरामध्ये आणण्यात येणार आहेत. सोमवार दि. १६ रोजी पहाटे कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक व महाप्रसाद कार्यक्रम होईल मंगळवार दि. १७ रोजी बाळूमामा चा पालखी सोहळा संपूर्ण आदमापूर गावामध्ये दिवसभर होणार असून ग्रामदैवत हनुमान व मरगूबाई मंदिराकडे भेटीसाठी जातो.

     यात्रा काळात पाच दिवस एकेरी वाहतुकीची यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याचा प्रशासनाचा मानस असून पोलीस यंत्रणा दक्ष आहे. मुरगुड सोनाळी बिद्री कोल्हापूर गारगोटी असा एक मार्ग तर मदाळतिदा हतात्मा स्वामी वारके

 सुतगिरणी वाघापूर पाटी निढोरी मुरगुड असा दुसरा मार्ग असणार आहे. यात्रा काळात शांतता राखण्याचे व देवालय समिती व आदमापूर ग्रामस्थांना भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular