दोनवडे: खुपिरे ता.करवीर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण उर्फ बबलू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच ग्रामीण रुग्णालय खुपिरे येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
खुपिरे येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठ्या संख्येने रक्तदान केले. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात सुमारे ६५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तसंकलनाची जबाबदारी महालक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर यांनी पार पाडली.
यावेळी बोलताना प्रवीण पाटील यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. तरुणांनी पुढे येऊन नियमित रक्तदान करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास नूतन खुपीरे पंचायत समिती सदस्या सौ. आशा प्रवीण पाटील,सरदार आनंदा पाटील,संताजी पाटील, वसंत हरी पाटील डॉक्टर. शरद आयरे,शरद पाटील मंथन पाटील अनिकेत शिंदे,राज हुजरे, हर्षद हुजरे, धनंजय हराळे, आदित्य पाटील,स्वप्नील पाटील आदीनी रक्तदान केले.
परिसरातील विविध मान्यवर, स्वयंसेवक व नागरिक यावेळी उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.