दोनवडे:
खुपिरे (ता. करवीर) : सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खुपिरे येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती करवीर तालुका अध्यक्ष महेश मारुती कांबळे यांच्या वतीने गर्ल हायस्कूल, खुपिरे येथे विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला रामकृष्ण पाटील, बजरंग दूध संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, माजी डेप्युटी रंजीत पाटील, कृष्णात बंगे, लक्ष्मण जाधव, कृष्णात पाटील, बाळू हुजरे, संभाजी हुजरे, अमर केंबळेकर, बाळू पाटील, युवराज रुद्राप पाटील, अशोक पाटील, सर्जेराव हराळे सर, संभाजी निकम, सुनिल कांबळे, विनायक पांडव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. डी. धुंदरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात रामकृष्ण पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्जेराव हराळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.