बालिंगा( मोहन कांबळे):
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत बालिंगा सबस्टेशनकडील उच्चदाब वाहिनीचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याने बालिंगा व नागदेववाडी जल उपसा केंद्रांवरील पंपिंग पूर्णपणे बंद राहील.
यामुळे खालील भागांवर परिणाम होईल:
सोमवार, २० एप्रिल: दैनंदिन पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील.
मंगळवार, २१ एप्रिल: पाणी पुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होईल.
बाधित होणारे प्रमुख भाग:
सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, राजोपाध्येनगर, देवकर पाणंद, संपूर्ण शिवाजी पेठ, महाद्वार रोड, मंगळवार पेठ, गंगावेश, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शाहुपुरी ५ ते ८ वी गल्ली, बागल चौक आणि संलग्न उपनगरे.
पाणी कपातीचा हा कालावधी लक्षात घेऊन नागरिकांनी रविवारीच पुरेसा पाणी साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरने वापर करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.