पन्हाळा प्रतिनिधी-शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची संपूर्ण धुरा सांभाळण्याचे काम महाराणी ताराराणी यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते.
लवकरात लवकर शासनाकडे हा प्रस्ताव पाठवावा असे विचार आमदार विनय कोरे यांनी मांडले.
प्रस्ताव पाठवल्यानंतर या कामासाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
छत्रपती ताराराणींनी मराठ्यांचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नंतर फार मोठी योगदान दिले होते. या रणरागिनीने पन्हाळा येथून सत्तेची सूत्रे चालवली होती.
पन्हाळ्यात त्यांच्या नावाची निशाणी म्हणून फक्त त्यांच्या नावाचा राजवाडा पाहायला मिळतो इतर कोणतीही त्यांच्या नावाचे निशान पन्हाळ्यात पाहायला मिळत नाही. त्यामुळे ताराबाईंचे भव्य स्मारक पन्हाळ्यात व्हावे अशी अनेकांकडून इच्छा व्यक्त केली जात आहे.
आणि या सर्व गोष्टीचा विचार करून पन्हाळा नगर परिषदेने असा ठराव केलेला आहे. त्यांच्या जागेच्या निश्चितीसाठी ज्येष्ठ नगरसेवकांची एक समिती निर्माण करण्यात आली आहे.
तरी हा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा की जेणेकरून त्यासाठी निधी उपलब्ध करून देता येईल व भव्य असे ताराराणींचे स्मारक पन्हाळ्यामध्ये डौलाने उभं राहील. यासाठी प्रयत्न करता येईल असे विचार पन्हाळा शाहूवाडी चे आमदार विनय कोरे यांनी मांडले.