Tuesday, June 16, 2026
HomeCrimeप्रयाग चिखलीत दोन घरे फोडून 11 तोळे व रोकड लंपास केले...

प्रयाग चिखलीत दोन घरे फोडून 11 तोळे व रोकड लंपास केले…

प्रयाग चिखली वार्ताहर:
करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यानी सरदार गल्ली येथील भर वस्तीतील कुलूप बंद असलेली दोन घरे फोडून सुमारे ११ तोळे सोने व वीस हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडली.
दोन कुलूप बंद घरांबरोबरच एक ब्युटी पार्लर दुकान आणि कासाराचे दुकान फोडून किरकोळ चोरी झाली आहे.भर वस्तीत घडलेल्या घटनेमुळे चिखली गावामध्ये खळबळ माजली आहे.
दरम्यान करवीर चे डी वाय एस पी सुजितकुमार क्षिरसागर पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांनी घटनास्थळी भेटी देऊन पोलिसांचे ठसे तज्ञ, शानपथकाद्वारे तपास सुरू केला.
सरदार गल्लीतील हरी वसंत झिरंगे हे कुटुंबासहित तुळजापूर येथे देव दर्शनासाठी घराला कुलूप लावून गेले होते. जिरंगे यांच्या समोरील लक्ष्मण बाळासाहेब लोहार हे देखील चिखलीतील घराला कुलूप लावून सुट्टी निमित्त कुटुंबासहित फुलेवाडी येथील घरी राहावयास गेले होते.
रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन्ही घरात कुलूप तोडून प्रवेश केला आणि तिजोऱ्या फोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी हरी झिरंगे यांचे सुमारे 11 तोळे सोने गेल्याचे सांगण्यात आले तर लक्ष्मण लोहार यांच्या घरातील देखील तिजोरी फोडून लहान मुलांचे दागिने व वीस हजार रोकड असा सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला असून कासाराचे दुकान व ब्युटी पार्लर दुकानांमध्ये किरकोळ चोरी झाली आहे. घरफोडी करताना चोरट्याने आजूबाजूच्या चार सहा घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या.
दोन घरफोडींबरोबरच चोरट्यांनी येथील प्रयाग रोडवरील एक ब्युटी पार्लर आणि कासाराचे दुकान फोडण्याचा प्रयत्न देखील केला. चोरटे चार चाकी मधून आल्याचे आणि शिंगणापूर गावाच्या दिशेने प्रसार झाल्याचा संशय एका ग्रामस्थांनी बोलून दाखविला
*ग्रामपंचायतीचे सर्व सीसीटीव्ही कूचकामी*
येथील ग्रामपंचायतीने काही महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करत संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा उपक्रम राबवला होता. कॅमेरे लावल्यापासून अवघ्या काही दिवसांपासून हे सर्व सीसीटीव्ही आज पर्यंत बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे तपासात अडचणी आल्या.
 *रेकी झाल्याचा संशय….*
चोरट्यांची टोळी कुलूपबंद घरांवर डल्ला मारते. येथील फोडलेली घरे शक्यतो कुलूप बंद नसतात. अवघ्या एक दिवसात घर बंद होते आणि घरफोडी होते हे संशयास्पद आहे. त्यामुळे गावामध्ये काही संशयित लोक अगोदर फिरत होते कोणते घर कुलूप बंद आहे याची देखील रेकी झाली असावी. अशी चर्चा गावामध्ये सध्या चालू आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular