बहिरेश्वर प्रतिनिधी..
पासार्डे ता करवीर येथील यूवक
प्रकाश दिनकर पाटील
वय वर्ष 38 यांचा नवलेवाडी ता पन्हाळा नजीक एस टी व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत अपघाती मृत्यू झाला तर या अपघातात त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आपल्या पत्नी व मूलगी सोबत सायंकाळी म्हासुर्ली पैकी सावतावाडी येथे पाहुण्यांकडे निघाला होता. त्यावेळी नवलेवाडी नजीक एस टी व दूचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली त्याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व मुलगी जखमी झालेत.सदर घटनेची नोंद कळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.. प्रकाश चा स्वभाव मनमिळाऊ असलेने त्याचा मित्र परिवार खुप मोठा होता.त्याच्या अपघाती मृत्यूमुळे मित्रपरिवार व पासार्डे गावावर शोककळा पसरली आहे..