कोल्हापूर/दोनवडे : श्रीकांत पाटील
मे सरला आणि आता जून संपत आला तरी पाऊस पडेना. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे ढोंग करून वाऱ्यावर सोडल्याची सद्यस्थिती आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले. आता तीच परिस्थिती आहे.
राज्य सरकारने आजपर्यंत दिलेल्या जाहीरनाम्यात किती आश्वासने पुरी केली एव्हढाच जर शेतकऱ्यांचा कळवळा होता मग त्यांचा सातबारा का कोरा केला नाही. उलट खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांना झुलवत ठेवले.
प्रामाणिक शेतकरी कायमचं वंचित!
कॉग्रेस आघाडीचे सरकार असताना कायम कर्ज भरणारा शेतकरी वंचित राहिला माध्यमांनी आवाज उठवल्यावर त्यावेळचे आ. पी एन पाटील यांनी विधानसभेत पहिल्यांदा मागणी केली. त्यावेळी प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार ₹ अनुदान देण्यात आले. प्रामाणिक शेतकरी कोणतीही उलाढाल करून पीक कर्ज भरतो मात्र आजपर्यंत कर्ज बुडव्यांना कर्जमाफी झाली प्रामाणिक शेतकऱ्याने कर्ज भरले त्याला ५० हजार ₹ आणि बुडव्यांची संपूर्ण कर्जमाफी हा कुठला न्याय?
आता पण भाजप सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पण नियम अटी शर्थी लावल्या आहेत. पहिले कर्ज भरा मग तुम्हाला ५० हजार ₹ व कर्जमाफीचा लाभ मिळेल. असे घुमजाव केले आहे. सत्तेवर यायच्या आधी मोठी आश्वासने दिलीत ती पहिली पूर्ण करा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.