Thursday, June 18, 2026
HomeAdministrationशक्तीपीठ महामार्गासाठी करवीर तालुक्यातील जमिनी संपादन प्रक्रियेचे आदेश निघालेत

शक्तीपीठ महामार्गासाठी करवीर तालुक्यातील जमिनी संपादन प्रक्रियेचे आदेश निघालेत

कोल्हापूर, दि. १८ : पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) या प्रस्तावित महाराष्ट्र शक्तिपीठ  महामार्गासाठी करवीर तालुक्यातील जमिनी संपादन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येत असून संबंधित जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात येणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) हे या महामार्गाचे प्राधिकरण असून महामार्गाच्या बांधकाम, देखभाल, व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या जमिनी संपादित करण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने संबंधित जमिनींचे संपादन करण्याची घोषणा केली आहे.

 प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, करवीर तालुक्यातील  जमिनींचा समावेश या संपादन प्रक्रियेत करण्यात आला आहे. ज्या जमीनधारकांच्या हरकती यापूर्वीच विचारात घेण्यात आलेल्या नाहीत किंवा ज्यांची सुनावणी झालेली नाही, अशा हितसंबंधित व्यक्तींना अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत लेखी आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.

संबंधित आक्षेप व सूचना भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, करवीर उपविभाग, जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे कारणांसह लेखी स्वरूपात सादर कराव्या लागणार आहेत.

दरम्यान, शक्तिपीठ  महामार्ग प्रकल्पामुळे विदर्भ ते कोकण असा दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग विकसित होणार असला तरी मात्र, जमिनी संपादनाच्या प्रक्रियेमुळे  स्थानिक शेतकरी हा भूमिहीन होणार आहे त्यामुळे  प्रस्तावित प्रकल्पाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular