कोल्हापूर/ दोनवडे : श्रीकांत पाटीलगेली दोन दिवस उपसा बंदीच्या आदेशामुळे नदीकाठच्या अनेक गावांना पाणीटंचाईची झळ पोसावी लागली प्रशासनाने गांभीर्य ओळखून उपसा बंदी शिथिल केली होती. आता पुन्हा उपसा बंदी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यामुळे गैबी बोगद्यातून भोगावती नदी पात्रात सोडलेले नाही सध्या भोगावतीसह कासारी- कुंभी या नद्यांचे पाणी पात्र कोरडे टाक पडले होते आता उपसा बंदी शिथिल केल्यामुळे एक आशेचा किरण मिळाला आहे. महाराष्ट्र शासन व पाटबंधारे विभागाने दि.१५ जून पासून पुढील आदेशापर्यंत शेतीच्या पाण्यासाठी उपसाबंदी जाहीर शिथिल केली होती. आता पुन्हा उपसा बंदी केल्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे.
मागील वर्षी महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता, जिल्ह्यातील सर्वच लघु, मध्यम व मोठी धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली होती. त्यामुळे यावर्षी कोल्हापूर जिल्हयासाठी शेतीसाठी पाणी टंचाई भासणार अशी परिस्थिती नव्हती. जिल्ह्यातील सर्वच लघु,मध्यम व मोठी धरणे पुर्ण क्षमतेने भरली होती तर किमान ३० जून पर्यंत सर्वच घटकांसाठी पाणी पुरले पाहिजे होते मग आत्ताच पाणी टंचाईचा प्रश्न का आला याला जबाबदार कोण हा पण प्रश्न आहे ? याबाबत कोल्हापूर इरिगेशन फेडरेशन यांनी सातत्याने आवाज उठवला पाटबंधारे विभागाने गांभीर्याने लक्ष देत उपसा बंदी शिथिल केली होती. मग अचानक पुन्हा उपसा बंदी केली असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर इरिगेशनचे फेडरेशनचे निवेदन!
सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे शेतीसाठी वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. जर हे शेतकऱ्याचे पिक वाळून गेले तर त्याची वर्षभराची मेहनत वाया जावून आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची उपल्बधता आहे अशा ठिकाणची उपसाबंदी ३० जून पर्यंत उठवावी अशी मागणी केली होती. येथून पुढे प्रत्येक वर्षी पाण्याचे योग्य नियोजन करावे जेणे करुन शेतीसाठी पाणी किमान ३० जूनपर्यंत पुरेल याबाबत दक्षता घ्यावी. या आशयाचे मागण्याचे निवेदन कोल्हापूर इरिगेशन फेडरेशनच्या वतीने पाटबंधारे विभागाची अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांना देण्यात आले.
यावेळी पाटबंधारे विभागाच्या वतीने अधीक्षक अभियंता पाटोळे व ज्योती देवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणातील पाण्याची उपलब्धता व पाणीसाठ्याची माहिती घेऊन व महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 31 ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचे मान्य केले. उद्यापासून लावलेली उपसा बंदी रद्द करून तीन दिवस पाणी उपसण्यासाठी चालू करण्याचे आश्वासन इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले होते.पुन्हा उपसा बंदी झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या अल निनोमुळे पाऊस लांबला आहे. दूधगंगा धरणाची संपूर्ण गळती युद्धपातळीवर यंत्राना लावून काढावी म्हणजे पुढील वर्षी तरी पाण्याची उपलब्ध निर्माण होईल व पाणी टंचाई भासणार नाही अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात माजी आमदार संजयबाबा घाटगे,विक्रांत पाटील-किनीकर,राजेंद्र सूर्यवंशी, प्रदीपकुमार पाटील,शरद पाटील, बाबासाहेब देवकर,भारत पाटील- भुयेकर, चंद्रकांत पाटील- पाडळीकर, सुभाष शहापुरे,सखाराम चव्हाण,इंद्रजीत पाटील-आबा,सचिन जमदाडे,सुनील मगदूम,बयाजी शेळके,चंद्रकांत पाटील,भगवान पाटील,सुरेश पाटील, जगनाथ पाटील,आत्माराम चौगले, ज्ञानदेव पाटील,महादेव सुतार, व सचिव मारुती पाटील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था प्रतिनिधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.