बहिरेश्वर प्रतिनिधी..
उपवडे (ता. करवीर) येथील लघू तलावाची पाणी साठवणूक क्षमता ०.२७ दलघमी (दशलक्ष घनमीटर) इतकी आहे. या तलावाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता ०.२५ दलघमी असून, सिंचनासाठी २३ हेक्टर क्षेत्रास यातून पाणी उपलब्ध होते
उपवडे या गावात लघू पाटबंधारे विभागाकडून इ.स १९९६ साली उपवडे,स्वयंभूवाडी,बोलोली,
आरडेवाडी पासार्डे,बारावाडी परिसरातील गावासाठी सिंचनाचे एक प्रमुख साधन म्हणून उपवडे लघू तलावाची बांधणी करण्यात आली आहे. परिसरातील शेतीसाठी संजिवनी ठरलेला तलाव म्हणून ओळख असलेल्या उपवडे तलावातील गाळ काढण्याचे काम विठाई चंद्राई सामाजिक व शैक्षणिक फौंडेशनच्या वतीने यूद्धपातळीवर सूरू करण्यात आले आहे..
तलाव बांधणीपासुन आजपर्यंत या तलावातील गाळ कधीही काढला नसल्याने पाण्याचा फुगवठा दिसतो मात्र प्रत्यक्षात पाणी साठवणुक कमी होते.. म्हणून तलावातील गाळ काढणे गरजेचे होते.. वेळोवेळी शेतकऱ्यांनी गाळ काढण्याची मागणी करूनही पाटबंधारे विभागाकडून दिरंगाई होत होती.
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तलावाने तळ गाठला आहे यातून हजारो टन गाळ काढला तर पुढील वर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही हे लक्षात घेता व शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते विठाई चंद्राई शैक्षणिक सामाजिक फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मुगडे यांचे वतीने स्वखर्चाने तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे..यासाठी फौंडेशनच्या च्या वतीने दोन जेसीबी व ट्रॅक्टर ट्राॅली उपलब्ध करून देण्यात आली आहे.या राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल बारावाडीचे सरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी वर्ग यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे…