Saturday, June 27, 2026
HomeAdministrationकेडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानी :वार्षिक...

केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानी :वार्षिक पतपुरवठा आढावा बैठकीत गौरव

कोल्हापूर दि. २७:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये नेहमीच अग्रभागी राहिलेली आहे. या बँकेने वार्षिक पुरवठ्यासह मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीक कर्ज वाटप यामध्ये आघाडी घेतली आहे. याबद्दल कोल्हापूर जिल्हा वार्षिक पतपुरवठा आढावा बैठकीमध्ये बँकेचा गौरव झाला. जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांचा या तिन्ही विभागातील सन्मानपत्रे देऊन गौरव झाला. केडीसीसी बँकेने वार्षिक पतपुरवठ्यामध्ये कृषी व तत्सम क्षेत्र, लघुउद्योग क्षेत्र, अन्य प्राधान्य क्षेत्र, एकूण प्राधान्य क्षेत्र, एकूण अ- प्राधान्य क्षेत्र अशा सर्व स्तरावर ईष्टांकाच्याही पुढे जात पतपुरवठा केला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात संपन्न झाली.

याबाबत अधिक माहिती अशी, सन २०२५-२६ या सालामध्ये पिक कर्जापोटी बँकेला रू. २४५० कोटी एवढे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टाच्याही पुढे जात बँकेने तब्बल रू. २,५६४ कोटी रुपयांचे वाटप केले. या पद्धतीने बँकेने १०५ टक्के उद्दिष्ट पार करण्यात यश मिळवले.

*सबंध महाराष्ट्रात ऊच्चांक……!*
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्हा हा सबंध महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. तसेच; कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रस्थानी आली आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ८१७ लाभार्थ्यांना रू. अकरा कोटी एवढे अर्थसाहाय्य केले आहे. अशा पद्धतीने या उपक्रमात केडीसीसी बँकेने सबंध महाराष्ट्रात उच्चांक केला आहे.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक विशाल गोंडके, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्रनाथ श्रीवास्तव, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक रोहन मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोंधळे, आरसेटीचे संचालक प्रशांत कापूरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, महामंडळांचे प्रतिनिधी आणि बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular