Sunday, June 28, 2026
HomePoliticalटीईटी पेपरफुटी प्रकरणी काँग्रेसचे कोल्हापुरात निषेध आंदोलन; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

टीईटी पेपरफुटी प्रकरणी काँग्रेसचे कोल्हापुरात निषेध आंदोलन; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर, दि. २८ जून : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि. २८) सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासन आणि शिक्षण विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नीट परीक्षा पेपरफुटीमुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून संबंधित प्रकरणात कारवाई सुरू असतानाच महाराष्ट्रात टीईटी परीक्षा पेपरफुटीची घटना घडल्याने विद्यार्थी, पालक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून शिक्षण विभागावर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या आंदोलनात कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण केसरकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पवार, महानगरपालिका काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक रोहित कवाळे, अजित पवार, भरत रसाळे, शशिकांत पाटील, संदीप बिरांजे, सचिन चौगुले, अभिजीत देठे, जय पटकारे, ईश्वर परमार, सिंधू शिराळे, संपतराव पाटील, दीपक थोरात, अक्षय शेळके, मयूर पाटील, संजय पटकारे, प्रथमेश कांबळे, रियाज सय्यद, आकाश शेलार, अशोक माळी, यशवंत थोरवत, युवराज लुगारे पाटील, राकेश कांबळे, मुजफ्फर टीनवाले, आदित्य कांबळे, विजय जाधव, महेश सूर्यवंशी, विजयानंद पोळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular