Friday, July 3, 2026
HomeAdministrationकोल्हापूरकरांना पाणी टंचाई आता भेडसावणार नाही.. थेटपाईपलाईन चा एक पंप चालू.

कोल्हापूरकरांना पाणी टंचाई आता भेडसावणार नाही.. थेटपाईपलाईन चा एक पंप चालू.

बालिंगा/मोहन कांबळे.

कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढल्याने कोल्हापूर शहराला पुरवठा होणारा थेट पाईपलाईनचा बंद पडलेल्या पंपा पैकी काळम्मावाडी धरणातील एक पंप सुरू झाल्याने आता शहराची पाणी टंचाई कमी होणार आहे.
आज दुपारी काळम्मावाडी मधील एक पंप चालू झाल्याने उपसा जोरात सुरू आहे, त्यामुळे शिंगणापूर पंपिंग स्टेशन जरी बंद पडले तरी बालिंगा, नागदेववाडी तसेच काळम्मवाडी येथून शहराला थेट पाइपलाइन व्दारे पाणीपुरवठा केला जाईल.
जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील यवलुज, शिंगणापूर, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नदिकाठचे लोकांना सतर्क रहाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular