पन्हाळा:l सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी वनक्षेत्रात निसर्गाची नासधूस करणाऱ्या 5 तरुणांवर पन्हाळा वन विभागाने कारवाई केली आहे.
दिनांक 03/08/2026 रोजी `patilsuraj_02` या इंस्टाग्राम आयडीवरून मौजे वादेवाडी, कक्ष क्रमांक 850 मधील मसाई पठार, संवर्धन राखीव क्षेत्रात जाऊन नैसर्गिक वनस्पतींची तोडफोड करून त्याची रील बनवून ती प्रसारित केल्याची माहिती वन विभागाला मिळाली.
ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पन्हाळा आणि वनपाल पन्हाळा यांनी तातडीने चौकशी केली. त्यात रीलमधील खालील 5 जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले:
1. सुरज प्रकाश पाटील- रा. निवडे, ता. पन्हाळा
2. सुमित हिदुराव गुरव – रा. सोनुर्ले, ता. शाहुवाडी
3. रोहित सुनील जाधव – रा. कोलोली, ता. पन्हाळा
4. सुरज मारुती पाटील – रा. नंदगाव, ता. शाहुवाडी
5. सिद्धीराज जानदेव पाटील – रा. निवडे, ता. पन्हाळा
चौकशीदरम्यान सर्वांनी आपला गुन्हा मान्य केला. त्यांच्याकडून वन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10,000 रुपये उपद्रव शुल्क वसूल करण्यात आले.
ही कारवाई मा. उपवनसंरक्षक, कोल्हापूर श्री. धैर्यशील पाटील आणि मा. सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियंका दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अजित माळी, वनपाल श्री. सागर पठाडे, वनरक्षक श्री. राहुल जोनवाल व श्री. किरण पाटील यांच्या पथकाने केली.
वन विभागाचा इशारा: नैसर्गिक संपत्तीची नासधूस करून सोशल मीडियासाठी रील बनवणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल.