*कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ गोकुळशी संलग्न ५६९ अंतिम अवसायनातील अपात्र संस्थेच्या वतीने न्यायालयात दाद मागून सदर संस्थेना न्याय मिळवून देणार असल्याची भूमिका आमदार सतेज पाटील गटाच्यावतीने मांडण्यात आली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गोकुळ दुध संघाशी संग्लन असणाऱ्या १३२० संस्थांपैकी ५६९ संस्था अपात्र ठरवल्या होत्या. यावर सतेज पाटील गटाच्या वतीने जोरदार हरकत घेण्यात आली आहे. गोकुळशी संलग्न ५६९ अंतिम अवसायनातील अपात्र संस्थेच्या वतीने न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार पाटील गटाच्या वतीने सांगण्यात आले.