कोल्हापूर 10 : मोटार वाहन कायदा 115 व 116 अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारान्वये दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.166 – जी वरील कळे ते कोल्हापूर हा रस्ता बंद करुन गगनबावडा कडून येणारी वाहतुक सांगरुळ फाटा – कुडित्रे -कोगे-पाडळी- बालिंगा मार्गे कोल्हापूरकडे तसेच कोल्हापूरकडून येणारी वाहतुक बालिंगा-पाडळी-कोगे-कुडित्रे-सांगरुळ फाटा मार्गे गगनबावडाकडे वळविण्यात परवानगी व वाहतुक सुरक्षा उपाययोजनेद्वारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी निगर्मित केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६-जी वरील कळे ते कोल्हापूर या रस्त्याच्या ईपीसी (EPC) पद्धतीने सुरू असलेल्या कामांतर्गत मौजे बालिंगा (कि.मी. ७९+५००) येथील प्रमुख पुलाचे (Major Bridge) बांधकाम प्रगतीपथावर आहे. या पुलावरील स्पॅन P1-P2 च्या स्लॅब काँक्रीटकरणाचे काम मे. व्ही.पी.एस.सी या कंत्राटदारामार्फत 10 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या स्लॅब काँक्रीटीकरण्याच्या कामासाठी प्रस्तावित नवीन पुलावर काँक्रीट बूम प्लेसर उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन पुलावरील जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाणार असून कामाच्या स्वरुपामुळे पुलावरुन वाहनांची सुरक्षित वाहतूक करणे शक्य होणार नाही. त्यामुळे
सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.