Wednesday, November 4, 2026
HomePoliticalगोकुळ मध्ये 4 शासन नियुक्त संचालक..

गोकुळ मध्ये 4 शासन नियुक्त संचालक..

कोल्हापूर:

राज्य मंत्रिमंडळाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघावर ४ शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीला आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यास मंजुरी दिली आहे.  या निर्णयामुळे गोकुळमधील सत्तेचे व बहुमताचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.   

या संचालकांमध्ये अशोक फराकटे, शिवसेना, राष्ट्रवादी नावेद मुश्रीफ, भाजप शोमिका महाडिक आणखीन एका शासन नियुक्त अधिकाऱ्याची चर्चा आहे.

४ शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकारही मिळणार..

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘गोकुळ’मध्ये शासननियुक्त सदस्य नेमण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. ‘गोकुळ’वर शासननियुक्त ८ सदस्य नेमण्याची मागणी पत्रात केली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गोकुळवर ४ शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. या संचालकांना मतदानाचा अधिकारही मिळणार आहे.

या निर्णयावर सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सहकार कायद्यातील बदलांवर आक्षेप घेतला आहे. तसेच अशा पद्धतीचे जर सरकार निर्णय घेत असेल तर निवडणूक कशाला घ्यायच्या असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular