Wednesday, April 15, 2026
HomeSportसायबर महाविद्यालयात ‘ऊर्जा’ क्रीडा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

सायबर महाविद्यालयात ‘ऊर्जा’ क्रीडा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

कोल्हापूर:

सायबर महाविद्यालयात तीन दिवसीय ‘ऊर्जा’ या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यास प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक अवधूत झरापकर तसेच एस कोच अकॅडमीचे सदा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सायबरचा क्रीडा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी बोलताना अवधूत झरापकर यांनी अशा क्रीडा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिकभाव, नेतृत्वगुण आणि क्रीडास्पर्धेची जिद्द विकसित होते, असे सांगितले. सातत्याने सराव आणि शिस्त यांमुळेच खेळाडू स्वतःचे तसेच महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करू शकतात, असे त्यांनी प्रतिपादन केले. सदा पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्पर्धांमध्ये खेळाडूवृत्ती जपण्याचे आवाहन केले.

या क्रीडा महोत्सवाचे आयोजन डॉ. सुरेश आपटे व प्रा. महांतेश पाटील यांच्या संघाने केले आहे. सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे, सचिव सी. ए. ऋषिकेश शिंदे आणि संचालक डॉ. आर. के. टेलर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वैयक्तिक व सांघिक अशा विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular