Wednesday, April 15, 2026
HomeAdministrationखुपिरे सरपंच तृप्ती पाटील यांच्या अपात्रतेचा निर्णय कायम गायरान अतिक्रमण भोवले;...

खुपिरे सरपंच तृप्ती पाटील यांच्या अपात्रतेचा निर्णय कायम गायरान अतिक्रमण भोवले; विभागीय आयुक्तांचा निर्णय

दोनवडे (प्रतिनिधी) :
खुपिरे (ता. करवीर) येथील सरपंच तृप्ती संजय पाटील यांच्या कुटुंबीयांनी गायरान मध्ये अतिक्रमण केल्याच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पदावरून अपात्र ठरवले होते. आयुक्तांनी हा अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांची प्रशासक पदाचीही संधी हुकली आहे.

गायरान जमिनीत अतिक्रमण केल्याने तृप्ती पाटील यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरपंच पदावरून अपात्र केले होते. या निर्णयाविरोधात सरपंच तृप्ती पाटील यांनी पुणे विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांच्या न्यायालयात अपील केली होती. त्यामध्ये आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा माजी सरपंच प्रकाश चौगले यांनी पुणे विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांच्या न्यायालयात अपील केली होती. त्यामध्ये आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच यांनाच प्रशासक म्हणून अधिकार देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. हा मुख्य प्रश्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular