बहिरेश्वर प्रतिनिधी:
बहिरेश्वर ते धनगरवाडया पर्यत मुख्यमंत्री सडक योजनेतून सर्व साधारण 5.5 किलो मीटर पर्यंत चा रस्ता 2022 साली करण्यात आला होता..या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे यातून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे..रस्तात खड्डा का खड्यात रस्ता हे समजत नाही एवढे मोठे खड्डे रस्त्यात पडले आहेत… कोणतीही दूर्घटना घडण्यापूर्वी रस्याची दुरूस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे…या कामासाठी 2028 पर्यंत देखभाल दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे..तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे..