Thursday, April 16, 2026
HomeCrimeभुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे सात गवत गंजींना आग; ९० हजारांचे नुकसान

भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे सात गवत गंजींना आग; ९० हजारांचे नुकसान

वार्ताहर – करडवाडी
भुदरगड तालुक्यातील करडवाडी गावात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. घराशेजारीच असणाऱ्या गवत गंज्या मध्यरात्री पेटत असल्याने भितीचे वातावरण.
घरांच्या मागच्या बाजूला शिवाजी बेलेकर नामदेव  जाधव, सत्तापा  निकाडे, सुनील बेलेकर, दशरथ बेलेकर, संतोष बेलेकर यांच्या गवत गंजींना सलग दोन रात्री मध्यरात्री  अचानक आग लागल्याची घटना घडत आहे.
आदल्या दिवशी  गवत गंजीना तर तिसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी असणाऱ्या ७ गवत गंजीना आग लावली आहे.या आगीत  जवळ पास २५० भारे गवत अंदाजे ९० हजार रुपयांचे गवत जळून खाक झाले असून संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.  जनावरांना पावसाळ्यात खाण्यासाठी घराशेजारी विकत आणून ठेवलेली वैरण जळून खाक झाल्याने आता पावसाळ्यात जनावरांना काय घालायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.  घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेत  घरातील पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सलग लागणाऱ्या आगीची काय भानगड आग कशी लागली याबाबत तर्क- वितर्कचालू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular