Thursday, April 16, 2026
HomeCrimeनवलेवाडी येथे रानडुक्कर मांस विक्री प्रकरणी चौघांना तीन दिवसांची वनकोठडी

नवलेवाडी येथे रानडुक्कर मांस विक्री प्रकरणी चौघांना तीन दिवसांची वनकोठडी

पन्हाळा (दि. ५ मार्च २०२६) – नवलेवाडी (ता. पन्हाळा) येथे रानडुक्कराच्या मांसाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या चौघांना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

दि. ३ मार्च २०२६ रोजी मा. वनपरिक्षेत्र पन्हाळा व मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) करवीर यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी संयुक्त गस्तीदरम्यान नवलेवाडी येथे रानडुक्कर (Wild Boar / Sus scrofa) या अनुसूची–II (भाग अ) मधील वन्यप्राण्याच्या मांसाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार श्री. विनायक संभाजी वैद्य यांच्या शेडवर छापा टाकण्यात आला.

छाप्यात एक रानडुक्कर जाळ्यात अडकवून कोयता व सत्तुरच्या साहाय्याने त्याचे मांस कापून विक्री करताना आढळून आले. यावेळी खालील आरोपींना रानडुक्कराच्या मांसासह ताब्यात घेण्यात आले:

  • श्री. भिवाजी उर्फ सरदार संभाजी पाटील (रा. वाकरे, ता. करवीर)

  • श्री. रतन हिंदुराव नवलव (रा. वाघुर्डे, ता. पन्हाळा)

  • श्री. विनायक संभाजी वैद्य (रा. वाघुर्डे पैकी नवलेवाडी, ता. पन्हाळा)

  • श्री. रमेश पांडुरंग पाटील (रा. वाघुर्डे, ता. पन्हाळा)

कारवाईदरम्यान कोयता, सत्तुर, वजनकाटा तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. वनरक्षक पनुत्रे यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत कलम २(१६), ९, ३९, ५० व ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दि. ४ मार्च २०२६ रोजी आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कळे-खेरीवडे (ता. पन्हाळा) यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. उपवनसंरक्षक, कोल्हापूर श्री. धैर्यशील पाटील, मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री. विलास काळे, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पन्हाळा श्री. अजित माळी तसेच संबंधित परिमंडळ वनअधिकारी व वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular