Tuesday, April 28, 2026
HomeCrimeकोल्हापूरात कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी SP कार्यालयासमोर निवेदन; SIT चौकशीची मागणी

कोल्हापूरात कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी SP कार्यालयासमोर निवेदन; SIT चौकशीची मागणी

कोल्हापूर, दि. 28 एप्रिल 2026 — कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली येथे घडल्याचा आरोप असलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 माहितीनुसार, शाहिद समीर सनदे आणि शाहरुख देसाई या दोघांनी 10 ते 15 मुलींना फसवून त्यांच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले, तसेच त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून मुलींवर धर्मांतराचा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, दोन्ही आरोपी एकमेकांमध्ये संबंधित मुलींचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी शाहिद सनदे याला पोलिसांनी अटक केली असून शाहरुख देसाई अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे:

  • शाहरुख देसाई याला सहआरोपी करून तात्काळ अटक करावी.

  • आरोपींमधील सोशल मीडिया चॅटिंगची सखोल चौकशी करून कटकारस्थान उघड करावे.

  • प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमावे.

  • तपासातील सर्व माहिती पारदर्शकपणे समाजासमोर मांडावी.

  • अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी.

  • महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

  • इतर संभाव्य पीडित मुलींना पुढे येण्यासाठी प्रशासनाने आवाहन करावे.

सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, पत्रकारांनी या घटनेला व्यापक प्रसिद्धी देऊन सत्य समोर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासन पुढील कारवाईबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular