Tuesday, June 2, 2026
HomeEducationराज्यशास्त्र विषयात दत्तात्रय रावण यांना पीएच.डी.

राज्यशास्त्र विषयात दत्तात्रय रावण यांना पीएच.डी.

कोल्हापूर : दत्तात्रय निवृत्ती रावण यांनी महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ असलेल्या महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिन्दी विश्वविद्यालय, वर्धा येथून राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.

त्यांनी “महाराष्ट्र विधानसभा चुनावों में मतदान व्यवहार (कोल्हापुर विधानसभा चुनाव 2019 के विशेष संदर्भ में)” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. हा संशोधन प्रबंध डॉ. अभिषेक सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला.

या संशोधनामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मतदान वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यात आला असून, निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच स्थानिक घटकांचे विश्लेषण करण्यात आले आहे. मतदारांच्या निर्णयप्रक्रियेवर विविध घटकांचा होणारा प्रभाव अधोरेखित करण्यात आल्याने राज्यशास्त्र, निवडणूक अभ्यास आणि लोकशाही प्रक्रियेच्या संशोधनासाठी या अभ्यासाचे निष्कर्ष महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

दत्तात्रय रावण यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल शिक्षक, संशोधक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular