मुंबई | प्रतिनिधी
नियमित रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तिकीट रद्द (Cancellation) आणि रिफंड नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले असून हे नियम १ ते १५ एप्रिलदरम्यान टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत. या बदलांमुळे तिकीट रद्द करताना मिळणाऱ्या रिफंडच्या रकमेवर थेट परिणाम होणार आहे.
तिकीट रद्द केल्यावर किती पैसे परत मिळणार?
नव्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या वेळेनुसार कपातीचे प्रमाण बदलले आहे:
-
८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक:
ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपेक्षा कमी वेळ उरला असताना तिकीट रद्द केल्यास एकही रुपया रिफंड मिळणार नाही. -
८ ते २४ तासांदरम्यान:
तिकीट रद्द केल्यास एकूण भाड्याच्या ५०% रक्कम कपात होईल. -
२४ ते ७२ तासांदरम्यान:
तिकीट रद्द केल्यास २५% रक्कम कपात होईल. -
७२ तासांपूर्वी:
यावेळी तिकीट रद्द केल्यास जुना फ्लॅट चार्ज (निश्चित शुल्क) लागू राहील.
प्रवाशांसाठी दिलासा देणारे बदल
नियम कडक झाले असले तरी प्रवाशांच्या सोयीसाठी काही डिजिटल सुविधा वाढवण्यात आल्या आहेत:
-
बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा:
आता ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत बोर्डिंग स्टेशन बदलता येणार. -
कुठूनही तिकीट रद्द करण्याची मुभा:
ऑफलाइन तिकीट आता कोणत्याही रेल्वे काउंटरवरून रद्द करता येईल. -
प्रवास श्रेणी (Class) बदल:
प्रवासादरम्यान आवश्यकतेनुसार क्लास अपग्रेड करता येणार. -
प्रवास माहिती अपडेट:
ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत डिजिटल अपडेट करता येणार.
जुने नियम काय होते?
-
ट्रेन सुटण्याच्या ४८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास फक्त फ्लॅट चार्ज (उदा. AC साठी ₹१८० + GST) कापला जायचा
-
१२ ते ४ तासांपूर्वी: ५०% कपात
-
४ तासांनंतर: रिफंड मिळत नव्हता
आता नो-रिफंडची मर्यादा ४ तासांवरून ८ तासांपर्यंत वाढवली आहे.
महत्त्वाच्या सूचना
-
वेटिंग लिस्ट तिकीट: चार्ट तयार होईपर्यंत कन्फर्म न झाल्यास, तिकीट आपोआप रद्द होऊन पूर्ण रिफंड मिळेल.
-
ट्रेन ३ तासांपेक्षा जास्त उशीर: TDR भरून पूर्ण परतावा मिळवण्याची सुविधा कायम आहे.

