पन्हाळा प्रतिनिधी-पन्हाळा गिरीस्थान अंतर्गत येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागणीची निवेदन पन्हाळा गिरीश त्यांच्या नूतन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी माळी साहेब यांना राष्ट्रीय बहुजन महासंघाचे राज्य सचिव अमर काळे व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख समीर गवंडी यांनी दिले.
पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या हद्दीत मागासवर्गीय विद्यार्थी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असलेली दिसून येतात. असे अनेक विद्यार्थी पन्हाळा नगरपरिषदेच्या हद्दीत राहत असून या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शासनाने विविध योजना राबवल्या आहेत पण पन्हाळा स्थानिक स्वराज्य संस्थेने या योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीनता दाखवली आहे प्राथमिक व माध्यमिक शालेय हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गणवेश शालेय साहित्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडे देऊन शासनाच्या या योजनेचा लाभ या विद्यार्थी वर्गाला लाभावा त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करून आपल्या कर्तव्यात भर घालावी व या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित न ठेवता त्यांना या योजनेचा लाभ प्रशासनाने द्यावा व त्यांना मिळणाऱ्या या लाभातून त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा याची जाणीव ठेवून आपापने कर्तव्य पार पाडावे. प्रशासनाने जातीय द्वेष व मनुवादी विचारसरणी न जपता मागासवर्गीय विद्यार्थी त्यांच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनाने आपली उदासीन भूमिका बाजूला ठेवून प्राथमिक व माध्यमिक हुशार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गणवेश शालेय साहित्य देण्याची तरतूद करावी. अशी मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे राज्यसचिव अमर काळे व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख समीर गवंडी यांनी व कार्यकर्ते यांनी केली केली आहे
तसेच पन्हाळगडावर येण्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करावा या मागणीची निवेदन ही नूतन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी माळी साहेब यांना देण्यात आले
पन्हाळगडावर इजा करण्यासाठी एकच मार्ग असून मागील काळात प्रवासी कर नाका ते बुधवार पेठ हा वाहतुकीचा मार्ग खचला होता एक महिने पन्हाळगडावरती एक ही वाहन ये जा करत नव्हते याचा परिणाम शालेय विद्यार्थी व आती तातडीने उपचार घेणाऱ्या रुग्णांवर ती पाहायला मिळाला त्यांचे या काळात अतोनात हाल झाले त्याच काळात पन्हाळ्यातील नागरिकांनाही अनेक संकटांना त्यावेळी सामोरे जावे लागले होते पन्हाळगडावर येण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने अनेक पर्यटक हे कमी प्रमाणात पन्हाळ्यावरती दिसत होते. पन्हाळ्यातील नागरिकांची उपजीविका ही बऱ्याच अंशी पर्यटकांवर अवलंबून असते आणि अशावेळी एखादा रस्ता खराब झाला तर संपूर्ण वाहतूकच ठप्प होते त्यामुळे या व्यवसायिकांना तोट्याला सामोरे जावे लागते. तरी प्रशासनाच्या या गंभीर स्वरूपाच्या प्रश्नाबाबत ठोस निर्णय घेऊन अधिकारी वर्गानेत्यासाठी लागणारा निधी ताबडतोब उपलब्ध करावा व इतर प्रशासनाच्या लागणाऱ्या परवानग्या घेऊन व सातत्याने प्रयत्नशील राहून पन्हाळगडावर एसटी बस व इतर वाहने इजा करण्यासाठी पर्यायी रस्त्याची निर्मिती ताबडतोब करावी अशी मागणी समीर गवंडी राष्ट्रीय बहुजन महासंघ कोल्हापूर व त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी केली आहे.