Saturday, April 18, 2026
HomeCrimeयवलुज मध्ये मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

यवलुज मध्ये मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील यवलुज गावात अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास दगडू चव्हाण (वय 35, व्यवसाय शेती, रा. यवलुज ता. पन्हाळा) यांची हिरो स्प्लेंडर प्लस ड्रम (काळ्या रंगाची) मोटारसायकल (क्र. MH-09-CF-9152) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ही घटना 16 मार्च 2026 रोजी सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत घडली.

सदर मोटारसायकल यवलुज गावातील गाव विहिरीजवळ असलेल्या फिर्यादी यांच्या शेडमधून चोरट्याने परवानगीशिवाय लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या मोटारसायकलची किंमत अंदाजे 18,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी 17 मार्च 2026 रोजी दुपारी 1.35 वाजता अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपास पन्हाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून चोरीस गेलेली मोटारसायकल शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular